Pradhan Mantri Pik Vima Yojana Latest News: शेतकऱ्यांसाठी दिलासा; पीक विमा योजनेचा शेवटचा हप्ता लवकरच मिळणार!

On: Thursday, June 12, 2025

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Pradhan Mantri Pik Vima Yojana Latest News: शेतकरी वर्ग खूप दिवसांपासून प्रतीक्षा करत होते, ती वेळ आता जवळ आली आहे. प्रधानमंत्री पीक विमा योजनेचा शेवटचा हप्ता लवकरच विमा कंपन्यांकडे वर्ग होणार आहे, आणि त्यानंतर नुकसान भरपाईचे पैसे थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहेत.

Pradhan Mantri Pik Vima Yojana Latest News - Final compensation to be credited to farmers’ bank accounts soon"

राज्य सरकारकडून यासाठीचा अंतिम हप्ता म्हणजे जवळपास 1000 कोटी रुपये – काही दिवसात विमा कंपन्यांना दिला जाणार असल्याची माहिती कृषी विभागातून मिळाली आहे.

सरकारकडून मंजुरीच काम अंतिम टप्प्यात

हा प्रस्ताव सध्या वित्त विभागाकडे आहे. त्यावर मंजुरी मिळाल्यावर लगेचच पैसे कंपन्यांकडे जातील. त्या पुढे मग, जे शेतकरी पात्र आहेत, त्यांच्यापर्यंत नुकसान भरपाई पोहोचवली जाईल.

खरंतर राज्य सरकारने आतापर्यंत 6584 कोटी रुपये आधीच वर्ग केले आहेत, पण शेवटच्या हप्त्याची वाट बघणं सुरू होतं.

बनावट अर्जांचा फटका रोखला, सरकारला 400 कोटींचा फायदा

गेल्या वेळेस अनेक ठिकाणी बनावट पीक विमा अर्ज झाले होते. यावेळी त्यांची नीट छाननी करण्यात आली आणि अशा हजारो अर्जांना फाटा देण्यात आला. त्यामुळे जवळपास 400 कोटींची बचत झाली.

राज्य सरकारलाच मिळणार २३०० कोटींचा परतावा?

विमा कंपन्या नफा धरून व्यवहार करतात. त्यानुसार, अंदाजे 20% रक्कम त्या नफा म्हणून गृहित धरतात. पण तरीही सरकारला जवळपास 2300 कोटींचा परतावा मिळू शकतो, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

जुनी योजना पुन्हा लागू

राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी जाहीर केलं आहे की, यंदाच्या वर्षीपासून पुन्हा जुनी पीक विमा योजना लागू होणार आहे. शेतकऱ्यांना फक्त 2% प्रीमियम भरायचा आहे, बाकीचा भार केंद्र व राज्य सरकार सांभाळणार.

कोणकोणत्या नैसर्गिक आपत्तीला विमा मिळणार?

या योजनेत आता वीज कोसळणं, गारपीट, अतिवृष्टी, पूर, चक्रीवादळ, कीड, रोगराई, दुष्काळ, भूस्खलन अशा विविध नैसर्गिक संकटांचा समावेश करण्यात आला आहे.

शेतकऱ्यांसाठी एक दिलासा!

या हप्त्यामुळे अनेक शेतकरी खरीप हंगाम सुरू करण्यासाठी आवश्यक ते खते, बियाणं, औषधं, यांची तयारी करू शकतील. सरकारने वेळेवर मदत केल्यास शेतकऱ्यांचा विश्वास अधिक वाढेल, अशीच शेतकऱ्यांची अपेक्षा आहे.

अधिक माहितीसाठी pmfby.gov.in या अधिकृत वेबसाईट ला भेट द्या!

FAQ: वारंवार विचारले जाणारे प्रश्न

शेवटचा हप्ता शेतकऱ्यांना कधी मिळणार आहे?

येत्या २-३ दिवसांत विमा कंपन्यांना रक्कम मिळाल्यावर लगेच नुकसान भरपाई शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात होईल.

नवीन नियमांनुसार प्रीमियम किती लागेल?

खरीपसाठी 2%, रब्बीसाठी 1.5% आणि नगदी पिकांसाठी 5%.

कोणत्या नैसर्गिक आपत्ती विमा अंतर्गत येतात?

वीज, पूर, अतिवृष्टी, कीड, रोग, गारपीट, चक्रीवादळ, दुष्काळ वगैरे.

Photo of author

लेखकाबद्दल

साहिल घिवे

मागील दहा वर्षांपासून डिजिटल सेवा क्षेत्रात कार्यरत असून, एक अधिकृत Mahaonline VLE आणि अनुभवी Aadhaar Supervisor म्हणून हजारो नागरिकांना ऑनलाईन सेवा आणि आधार संबंधित मदत पुरवली आहे. स्वतःचे Mahaonline केंद्र चंद्रपूर जिल्ह्यातील, गोंडपिपरी शहरात असून, केंद्राच्या माध्यमातून विविध शासकीय योजना, दाखले, पॅन कार्ड, आधार अपडेट, व इतर अनेक सेवा लोकांपर्यंत पोहोचवल्या आहेत. आणखी वाचा

Leave a Comment

WhatsApp Icon
व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉइन करा !