PM Kisan 20th Installment: पीएम किसान 20 वा हप्ता जूनमध्ये येण्याची शक्यता; ही ३ काम राहिली असल्यास हप्ता मिळणार नाही!

On: Saturday, June 7, 2025

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

PM Kisan 20th Installment: शेतकरी बांधवांसाठी एक दिलासादायक बातमी आहे. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत २० वा हप्ता लवकरच त्यांच्या खात्यात जमा होणार आहे.

PM Kisan 20th Installment June 2025 - Know eligibility and top 3 mistakes that can stop your payment

सरकारकडून पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी ६,०००/- रुपये तीन समान हप्त्यांमध्ये दिले जातात. आतापर्यंत १९ हप्त्यांचे वितरण झाले आहे आणि शेवटचा हप्ता फेब्रुवारी २०२५ मध्ये जमा झाला होता.

२० वा हप्ता कधी मिळेल?

योजनेनुसार हप्ता दर चार महिन्यांनी दिला जातो. फेब्रुवारीमध्ये शेवटचा हप्ता आल्यामुळे, पुढचा हप्ता जूनमध्ये येण्याची शक्यता आहे. मात्र, अद्याप अधिकृत तारीख जाहीर झालेली नाही.

हे सुद्धा वाचा: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना मे 2025! आजपासून खात्यावर येणार पैसे!

हप्ता वेळेवर मिळवायचा आहे? तर ही तीन काम पूर्ण असायला हवीत:

१. आधार कार्ड बँक खात्याशी लिंक असायला हव

तुमच आधार कार्ड तुमच्या बँक खात्याशी जोडलेल असेल, तरच DBT (थेट लाभ हस्तांतरण) मार्फत हप्ता खात्यात जमा होईल. अजून लिंकिंगच काम बाकी असेल, तर जवळच्या बँकेमध्ये जाऊन त्वरित ते पूर्ण करा.

२. जमिनीची पाहणी झालेली असावी

या योजनेचा लाभ फक्त शेती करणाऱ्या पात्र शेतकऱ्यांसाठी आहे. म्हणूनच, सरकारकडून जमिनीची वैधता तपासली जाते. जर ही पाहणी पूर्ण नसेल, तर हप्ता अडकण्याची शक्यता आहे.

३. ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करणे गरजेचे

पात्रता कायम ठेवण्यासाठी ई-केवायसी पूर्ण करणे अनिवार्य आहे. ही प्रक्रिया PM Kisan Portal वर किंवा जवळच्या CSC केंद्रात पूर्ण करता येते. ई-केवायसी पूर्ण न झाल्यास हप्ता रोखला जाऊ शकतो.

लक्षात ठेवा

वरील तीन कामांपैकी काही एक राहिल असेल, तर हप्ता येण्यास अडथळा निर्माण होऊ शकतो. त्यामुळे शेतकरी बांधवांनी ही सर्व काम वेळेत पूर्ण करून घ्यावीत. अधिक माहितीसाठी अधिकृत संकेतस्थळ pmkisan.gov.in वर वेळोवेळी भेट देत रहा.

हे सुद्धा वाचा: राज्यात प्रत्येकाला मिळणार हक्काचे घर; ३० लाख घरकुल मंजुर, महाराष्ट्र सरकारची घोषणा!

योजनेविषयी माहिती

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेतून पात्र शेतकऱ्यांना दर चार महिन्यांनी ₹२,००० इतका हप्ता दिला जातो. त्यामुळे वर्षाकाठी एकूण ₹६,००० रुपये थेट खात्यावर जमा होतात. १७वा हप्ता जून २०२४ मध्ये आणि १९वा हप्ता फेब्रुवारी २०२५ मध्ये दिला गेला होता. त्यानुसार, २०वा हप्ता जून महिन्यातच येईल, असा अंदाज आहे.

म्हणून, शेतकरी बांधवांनी दिरंगाई न करता या तीनही बाबींची पूर्तता करावी. यामुळे केवळ तुमचा २०वा हप्ताच वेळेवर खात्यात जमा होणार नाही, तर भविष्यातही योजनेचा लाभ अखंडितपणे मिळवण्याचा तुमचा मार्ग मोकळा होईल.

पीएम किसान २० वा हप्ता: जूनमध्ये अलर्ट! आताच करा ही ३ कामे!
पीएम किसान २० वा हप्ता: जूनमध्ये अलर्ट! आताच करा ही ३ कामे!
Photo of author

लेखकाबद्दल

साहिल घिवे

मागील दहा वर्षांपासून डिजिटल सेवा क्षेत्रात कार्यरत असून, एक अधिकृत Mahaonline VLE आणि अनुभवी Aadhaar Supervisor म्हणून हजारो नागरिकांना ऑनलाईन सेवा आणि आधार संबंधित मदत पुरवली आहे. स्वतःचे Mahaonline केंद्र चंद्रपूर जिल्ह्यातील, गोंडपिपरी शहरात असून, केंद्राच्या माध्यमातून विविध शासकीय योजना, दाखले, पॅन कार्ड, आधार अपडेट, व इतर अनेक सेवा लोकांपर्यंत पोहोचवल्या आहेत. आणखी वाचा

Leave a Comment

WhatsApp Icon
व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉइन करा !