LPG cylinder at 300Rs: फक्त ३००₹ मध्ये गॅस सिलेंडर; उज्ज्वला योजनेची नवी सबसिडी जाणून घ्या!

On: Tuesday, July 1, 2025

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

LPG cylinder at 300Rs: सध्याच्या महागाईच्या काळात, एलपीजी सिलेंडरच्या वाढत्या किंमतीमुळे सामान्य कुटुंबांचे आर्थिक गणित बिघडत आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने गरीबांसाठी एक मोठी घोषणा केली आहे. आता पात्र लाभार्थ्यांना एलपीजी सिलेंडर केवळ ३०० रुपयांत मिळणार आहे. ही सवलत कोणत्या योजनेअंतर्गत दिली जाते? कोणते नागरिक या योजनेसाठी पात्र आहेत? हे जाणून घेण्यासाठी पुढील माहिती वाचा.

LPG cylinder at 300Rs under Ujjwala Yojana for BPL families

पूर्वी ग्रामीण भागात बहुतांश घरांमध्ये, मातीच्या चुलींवर अन्न शिजवल जायच. अशा चुलींमधून निघणाऱ्या धुरामुळे महिलांना डोळ्यांची जळजळ, दम्याचे त्रास आणि श्वास घेण्यास अडचण यांसारख्या आरोग्यविषयक समस्या भेडसावत असत.

मात्र, गेल्या काही वर्षांत परिस्थिती बदलली आहे. आता गॅस चूल आणि एलपीजी सिलेंडरचा वापर गावांपासून शहरांपर्यंत झपाट्याने वाढला आहे. यामुळे स्वयंपाक अधिक सोपा आणि वेळबचतीचा झाला आहे. परंतु सिलेंडरची किंमत वाढल्यामुळे, गरीब कुटुंबांना मोठा आर्थिक भार सहन करावा लागतो. अशा वेळी प्रधानमंत्री उज्ज्वला योजना गरीबांसाठी दिलासादायक ठरत आहे.

प्रधानमंत्री उज्ज्वला योजना म्हणजे काय?

१ मे २०१६ रोजी, उत्तर प्रदेशातील बलिया येथून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते, प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेची सुरूवात करण्यात आली. या योजनेचा उद्देश गरीब, विशेषतः ग्रामीण भागातील महिलांना स्वच्छ इंधन म्हणजेच, एलपीजी उपलब्ध करून देणे हा आहे. लाकूड, कोळसा, शेणाच्या गोट्या यांचा वापर कमी करणे, महिलांचे आरोग्य सुरक्षित ठेवणे आणि पर्यावरणाच संरक्षण करणे, हा या योजनेमागचा मुख्य हेतू आहे.

या योजनेअंतर्गत, गरीब कुटुंबातील महिलांना मोफत गॅस कनेक्शन दिल जात. त्याचबरोबर दरमहा मिळणाऱ्या सबसिडीमुळे सिलेंडर स्वस्तात मिळतो. आतापर्यंत देशभरात १० कोटींपेक्षा जास्त कुटुंबांनी या योजनेचा लाभ घेतलेला आहे.

३०० रुपयांत सिलेंडर कसा मिळतो? LPG cylinder at 300Rs

या योजनेअंतर्गत १४.२ किलोच्या सिलेंडरवर सरकारकडून ३०० रुपयांची सबसिडी (LPG cylinder at 300Rs) दिली जाते. ही रक्कम थेट लाभार्थ्यांच्या आधारशी जोडलेल्या बँक खात्यात जमा केली जाते. उदाहरणार्थ, जर मुंबईमध्ये सिलेंडरची किंमत ८५२ रुपये असेल, तर उज्ज्वला योजनेचा लाभ घेणाऱ्या व्यक्तीला तो सिलेंडर फक्त ५५२ रुपयांत मिळतो. ही सबसिडी एका वर्षात कमाल १२ सिलेंडर रिफिलसाठी मिळू शकते. केंद्र सरकारच्या ह्या सवलतीमुळे, अनेक गरीब कुटुंबांना आर्थिक दिलासा मिळत आहे.

या योजनेसाठी कोण पात्र आहे?

या योजनेसाठी अर्ज करणारी व्यक्ती, भारतीय नागरिक असलेली महिला असावी आणि तिच वय किमान १८ वर्षे असण आवश्यक आहे. तसेच, तिच नाव गरीबी रेषेखालील (BPL) यादीत असण गरजेच आहे. त्या महिलेच्या घरात यापूर्वी कोणतही एलपीजी कनेक्शन नसाव.

विशेष म्हणजे अनुसूचित जाती (SC), अनुसूचित जमाती (ST), अन्य मागासवर्गीय (OBC), अंत्योदय अन्न योजना (AAY) अंतर्गत येणाऱ्या लाभार्थी, प्रधानमंत्री आवास योजनेचे लाभार्थी, वनवासी महिला किंवा SECC यादीतील महिलांना या योजनेत प्राधान्य दिल जात.

जर एखादी महिला प्रवासी मजूर असेल, तरीही ती या योजनेसाठी पात्र ठरू शकते. अशा महिलांनी स्वतःच स्वघोषणापत्र सादर करून अर्ज करता येतो.

अर्ज करताना लागणारी कागदपत्र

उज्ज्वला योजनेसाठी, अर्ज करताना अर्जदार महिलेकडे आधार कार्ड, बीपीएल रेशन कार्ड, बँक खात्याचा तपशील (पासबुक), रहिवासाचा पुरावा, पासपोर्ट आकाराचा फोटो, वयाचा पुरावा (जर आवश्यक असेल तर) आणि जातीचा दाखला (लागू असल्यास) ही कागदपत्र असण आवश्यक आहे. विशेष लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट म्हणजे, अर्जदाराच बँक खात आधार कार्डशी लिंक असण अत्यावश्यक आहे, जेणेकरून सबसिडीची रक्कम थेट खात्यात जमा होईल.

अर्ज कसा करावा?

ऑनलाइन अर्ज करण्याची प्रक्रिया खूपच सोपी आहे. सर्वप्रथम उज्ज्वला योजनेच्या अधिकृत वेबसाइट www.pmuy.gov.in वर जा. तिथे “Apply for New Ujjwala 2.0 Connection” या पर्यायावर क्लिक करा. त्यानंतर इंडेन, भारत गॅस किंवा एचपी गॅस यापैकी एका एजन्सीची निवड करा.

अर्ज फॉर्म भरताना तुमची वैयक्तिक माहिती, कागदपत्रांचे तपशील व बँक खात्याची माहिती भरून फॉर्म सबमिट करा. नंतर त्याचा प्रिंटआउट काढून, जवळच्या गॅस एजन्सीमध्ये तो फॉर्म कागदपत्रांसह जमा करा. सर्व कागदपत्रांची पडताळणी झाल्यानंतर १० ते १५ दिवसांच्या आत गॅस कनेक्शन मिळते.

जर तुम्हाला ऑफलाइन अर्ज करायचा असेल, तर तुमच्या भागातील जवळच्या गॅस वितरकाकडे जाऊन उज्ज्वला योजनेसाठीचा अर्ज फॉर्म मिळवा. तो फॉर्म पूर्ण भरून, सर्व आवश्यक कागदपत्रांसह एजन्सीमध्ये जमा करा. यानंतर तुमचं कनेक्शन, गॅस चूल आणि पहिला सिलेंडर मोफत दिला जाईल.

प्रधानमंत्री उज्ज्वला योजना, ही केवळ एक सरकारी योजना नसून ग्रामीण महिलांच्या आरोग्यसंवर्धनासाठी आणि आर्थिक सक्षमीकरणासाठीचा एक महत्त्वाचा टप्पा आहे. जर तुम्ही पात्र असाल, तर ही संधी दवडू नका. आजच अर्ज करा आणि या योजनेचा लाभ घ्या.

Photo of author

लेखकाबद्दल

साहिल घिवे

मागील दहा वर्षांपासून डिजिटल सेवा क्षेत्रात कार्यरत असून, एक अधिकृत Mahaonline VLE आणि अनुभवी Aadhaar Supervisor म्हणून हजारो नागरिकांना ऑनलाईन सेवा आणि आधार संबंधित मदत पुरवली आहे. स्वतःचे Mahaonline केंद्र चंद्रपूर जिल्ह्यातील, गोंडपिपरी शहरात असून, केंद्राच्या माध्यमातून विविध शासकीय योजना, दाखले, पॅन कार्ड, आधार अपडेट, व इतर अनेक सेवा लोकांपर्यंत पोहोचवल्या आहेत. आणखी वाचा

Leave a Comment

WhatsApp Icon
व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉइन करा !