Ladki Bahin Yojana Latest Update: राज्यात गेल्या काही महिन्यांपासून ‘लाडकी बहिण योजना’ ही महिला वर्गात खूपच चर्चेत आहे. सरकारकडून दरमहा १५०० रुपये थेट बँकेत जमा होण, ही आर्थिक मदत कित्येक घरांमध्ये आशेचा किरण ठरली आहे. परंतु आता ही योजना केवळ ‘अनुदान’ देणारी राहिलेली नाही, ती आता महिलांना स्वतंत्र अर्थसत्तेच्या दिशेने घेऊन जात आहे.

माझी लाडकी बहिण योजना – एका सामाजिक क्रांतीची सुरुवात
ही योजना सुरू झाली, तेव्हा अनेक महिलांनी त्याचा उपयोग मासिक खर्च, मुलांचे शिक्षण, औषध, घरखर्च यासाठी केला. पण योजनेच्या माध्यमातून काही तरी ‘स्वतःच’ करण्याच स्वप्नही अनेक जणींनी पाहिल होत.
आता पतसंस्थांच्या रूपात त्यांना ती संधी मिळतेय – अगदी शासनाच्या मान्यतेने.
लाडकी बहिण योजनेत पतसंस्था स्थापन करण्याची संधी – Ladki Bahin Yojana Latest Update
कालच दिनांक १८ जुन २०२५ रोजी, सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी एक महत्त्वपूर्ण निर्णय जाहीर केला (Ladki Bahin Yojana Latest Update), योजनेतील लाभार्थी महिलांना आता स्वतःच्या महिला पतसंस्था स्थापन करण्याची आणि त्यांच्या नावे नोंदणी घेण्याची संधी दिली जाणार आहे.
या निर्णयाचा थेट अर्थ असा की, महिलांनी एकत्र येऊन आपल ‘बँकेसारख’ एक आर्थिक केंद्र तयार कराव, जिथे त्या बचत करतील, गरजूंना कर्ज देतील, आणि आर्थिक व्यवहार स्वतः हाताळतील.
यामुळे त्या केवळ लाभार्थी म्हणून नाही, तर निर्णय घेणाऱ्या, संस्था चालवणाऱ्या, आणि इतर महिलांना मार्गदर्शन करणाऱ्या म्हणून पुढे येतील.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेंतर्गत लाभार्थी महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणास चालना देण्यात येणार आहे. यासाठी त्यांच्याच सहभागातून महिला नागरी सहकारी पतसंस्था स्थापन करून नोंदणी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी दिली. pic.twitter.com/jsgunf3aM3
— MAHARASHTRA DGIPR (@MahaDGIPR) June 18, 2025
महिला पतसंस्था म्हणजे काय?
पतसंस्था म्हणजे अशी सहकारी संस्था जिथे सदस्य पैसे साठवतात, आणि गरज असल्यास कर्ज घेतात. मात्र, ‘माझी लाडकी बहिण’ योजनेतून स्थापन होणाऱ्या पतसंस्था फक्त महिलांनीच चालवल्या जाणार आहेत.
या संस्थांमध्ये:
- महिलाच अध्यक्ष, सचिव, खजिनदार आणि संचालक असतील
- महिलांचं बचत नियोजन, कर्जवाटप आणि व्यवहार यांच निर्णय महिलाच घेतील
- पारदर्शकता, उत्तरदायित्व आणि गटशक्तीचा आदर्श निर्माण होईल
या सगळ्यामुळे महिलांमध्ये आत्मविश्वास, आर्थिक शिस्त, आणि नेतृत्व निर्माण होईल.
ग्रामीण आणि शहरी महिलांसाठी संधीच नव दार
ग्रामीण भागात, जिथ अजूनही अनेक महिला बँकांपासून दूर आहेत, त्यांच्यासाठी या पतसंस्था आशेच केंद्र ठरतील.
त्या शेतीपूरक उद्योग, मातीची भांडी, पापड-लोणच, शिवणकाम यासाठी सहजपणे कर्ज घेऊन व्यवसाय सुरू करू शकतात.
शहरी महिलांसाठी, ज्या शिक्षित असल्या तरी भांडवल अभावी उद्योग सुरू करू शकत नाहीत, त्यांच्यासाठीही ही योजना फार उपयुक्त ठरणार आहे. ब्युटी पार्लर, बुटिक, टिफिन सेवा, कोचिंग क्लासेस, अशा अनेक संधी त्यांच्यासमोर उभ्या राहतील.
समाजात ऐक्य आणि मदतीची भावना
या उपक्रमाचा एक अत्यंत महत्त्वाचा पैलू म्हणजे सामूहिक आधार.गावाकडच्या महिला आजही एकमेकींच्या पाठीशी उभ्या असतात. पतसंस्थांमुळे ही भावना अधिक घट्ट होईल. जर २५ महिलांचा गट असेल आणि त्यातली एक महिला अडचणीत असेल, तर बाकी २४ जणी तिच्यासाठी निधी उभारतील, निर्णय घेतील, आणि तिच्या पाठीशी उभ्या राहतील.
सरकारची भूमिका काय असेल?
सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्या माहितीनुसार, लवकरच या पतसंस्थांसाठी स्पष्ट मार्गदर्शक नियमावली जारी केली जाईल.
त्यामध्ये:
- किती महिलांनी एकत्र येऊन संस्था स्थापन करता येईल?
- किमान भांडवल किती लागेल?
- सुरुवातीला सरकार कोणतं प्रशिक्षण देईल?
- कोणत्या आर्थिक सेवा देता येतील?
या सगळ्या गोष्टींचा समावेश असेल. सुरुवातीला सरकारकडून प्रशिक्षण, मार्गदर्शन, आणि तांत्रिक मदतही देण्यात येणार असल्याचे संकेत आहेत.
महिला बचत गटांची सशक्त भूमिका
राज्यात आज हजारो महिला बचत गट काम करत आहेत. त्यांना आधीच बचत व कर्ज व्यवहारांचा अनुभव आहे.
हे गट आता सहजपणे पतसंस्था स्थापनेच्या दिशेने वाटचाल करू शकतात. यामुळे लाभार्थी महिलांना पूर्वीपेक्षा अधिक सक्षम पाठिंबा मिळेल, आणि स्थानिक पातळीवर महिलांच्या नेतृत्वाखाली मजबूत संस्था निर्माण होतील.
महिलांच्या हातात आर्थिक सत्तेची किल्ली!
‘माझी लाडकी बहिण’ ही योजना आता केवळ पैसे देणारी योजना राहिलेली नाही. ती महिलांना निर्णय घेणाऱ्या, मार्गदर्शक, आणि संस्था चालवणाऱ्या बनवत आहे. या पतसंस्थांमधून महिलांचा आत्मविश्वास फुलणार, त्यांच्या कुटुंबाला आधार मिळणार, आणि समाजात त्यांना नवीन ओळख मिळणार.