Ladki Bahin Yojana Business Loan: लाडक्या बहिणींना मिळणार व्यवसायासाठी थेट ४० हजार रुपये!

On: Saturday, June 21, 2025

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Ladki Bahin Yojana Business Loan: महाराष्ट्रात महिलांसाठी एक मोठी आणि आनंदाची बातमी समोर आली आहे. आता लाडकी बहिण योजनेतून महिलांना केवळ दरमहा पैसे मिळणार नाहीत, तर त्यांना स्वतःचा व्यवसाय सुरू करता यावा म्हणून सरकार ४० हजार रुपयांपर्यंत कर्ज देणार आहे. ही माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी स्वतः जाहीर केली आहे.

Ladki Bahin Yojana Business Loan offering ₹40,000 to women in Maharashtra

थोडक्यात सांगायचं तर…

‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना’ जून २०२४ मध्ये सुरू झाली, आणि काही महिन्यांतच तिला मोठी प्रसिद्धी मिळाली. कारण, दरमहा १५०० रुपये थेट खात्यावर जमा होऊ लागले. पण सरकारने केवळ इतक्यावरच न थांबता, आता महिलांना आणखी एक पाऊल पुढे जाऊन मदतीचा हात दिला आहे.

लाडकी बहिण योजनेबद्दल अधिक माहितीसाठीक्लिक करा
योजना ग्रुप जॉईन करण्यासाठीक्लिक करा

पण हे ४० हजार रुपये कोणाला आणि कसे?

या योजनेच्या लाभार्थी महिलांना आता व्यवसायासाठी थेट कर्ज (Ladki Bahin Yojana Business Loan) उपलब्ध होणार आहे. म्हणजेच, ज्या महिलांना सध्या १५०० रुपये मिळतात, त्या आता स्वतःचा छोटासा व्यवसाय सुरू करू शकतील. ३० ते ४० हजार रुपये इतक कर्ज त्यांना मिळू शकणार आहे. आणि विशेष म्हणजे हे कर्ज बँकेच्या माध्यमातून सरकारच्या भागीदारीत दिलं जाणार आहे.

कोण पात्र आहे यासाठी?

ही योजना कुणासाठी आहे, याचा विचार केल्यास त्यासाठी काही सोप्या अटी आहेत. सर्वप्रथम, अर्ज करणारी महिला ही महाराष्ट्राची रहिवासी असावी. तिच वय २१ ते ६५ वर्षांच्या दरम्यान असाव. घराच वार्षिक उत्पन्न २.५ लाख रुपयांपेक्षा जास्त नसाव. आणि हो, आधार कार्ड बँक खात्याशी लिंक असण हे आवश्यक आहे. या अटी पूर्ण करणाऱ्या महिला या योजनेसाठी पात्र असतील.

अर्ज प्रक्रिया कशी असेल?

अद्याप या योजनेची अंमलबजावणी प्रत्यक्ष सुरू झालेली नाही, पण सरकारने स्पष्ट केलय की, योजना लवकरच लागू होईल. बँकेमार्फत किंवा सरकारी वेबसाइटवरून अर्ज करता येणार आहे. तुमच्याकडे आधार कार्ड, बँक पासबुक, उत्पन्नाचा दाखला आणि तुम्ही कोणता व्यवसाय सुरू करणार आहात याची माहिती असण गरजेच आहे. म्हणजे, अगदी पारंपरिक वाटचाल होईल – पण सोपी.

लाडकी बहिण योजनेच विशेष काय?

ज्या महिलांना सरकारकडून आधीच दरमहा मदत मिळते, त्या आता स्वतःच काहीतरी सुरू करू शकतील. बऱ्याचदा महिलांना इच्छा असते की छोट दुकान, शिवणकाम, लोणच-चटणीचा व्यवसाय किंवा काही घरगुती उत्पादन सुरू कराव. पण पैशाअभावी हे शक्य होत नाही. आता या कर्जामुळे त्यांच्या स्वप्नाला बळ मिळेल.

अर्थसंकल्पात मोठा निधी

सध्या सरकारने या योजनेसाठी तब्बल ३६ हजार कोटी रुपयांची तरतूद २०२५-२६ च्या अर्थसंकल्पात केली आहे. तरीही, निवडणुकीच्या आधी जाहीर केलेली २१०० रुपये मासिक मदतीची घोषणा प्रत्यक्षात आली नाही. तरीही १५०० रुपयांसोबत मिळणार हे कर्ज (Ladki Bahin Yojana Business Loan) अनेक महिलांसाठी गेमचेंजर ठरू शकत.

अंमलबजावणीत कोणत्या गोष्टी महत्त्वाच्या?

सरकारची योजना चांगली असली तरी अंमलबजावणी तितकीच प्रभावी पाहिजे. अनेकदा अर्ज भरताना येणाऱ्या अडचणी, चुकीची माहिती देणे किंवा अपात्र व्यक्तींकडून योजनेचा लाभ घेणे अशा समस्या उद्भवतात. त्यामुळे सरकारने योग्य पडताळणी यंत्रणा उभी करावी लागेल. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे, महिलांना आवश्यक व्यावसायिक प्रशिक्षण आणि मार्गदर्शनही दिले पाहिजे.

आर्थिक स्वातंत्र्याचा खरा अर्थ

या योजनेमुळे महिलांना दरमहा पैसे मिळतच आहेत, पण आता व्यवसायासाठी थेट मदत मिळाल्याने त्या फक्त गृहिणी न राहता घरात उत्पन्न देणाऱ्या बनतील. ग्रामीण भागात जिथे संधी कमी आहेत, तिथे महिलांनी स्वतःचा व्यवसाय सुरू केला तर समाजाचीही स्थिती बदलेल. ‘महिला सक्षमीकरण’ ही फक्त घोषणा न राहता प्रत्यक्ष कृती होईल.

शेवटी…

लाडकी बहिण योजनेतून मिळणारं हे ४० हजारांच कर्ज (Ladki Bahin Yojana Business Loan) म्हणजे महिलांच्या आयुष्यात एक नवा अध्याय सुरू होण्यासारखं आहे.

सरकारने ही योजना जशी आहे तशी पारदर्शक आणि सोपी पद्धतीने राबवली, तर हजारो नव्हे तर लाखो महिलांच आयुष्य बदलेल. फक्त योजना सुरू करून थांबायच नाही, तर त्याचा योग्य उपयोग होतोय का हे पाहणही तितकच गरजेच आहे.

Ladki Bahin Yojana Business Loan च्या अधिक माहितीसाठी ladakibahin.maharashtra.gov.in या अधिकृत वेबसाईट ला भेट द्या.

Photo of author

लेखकाबद्दल

साहिल घिवे

मागील दहा वर्षांपासून डिजिटल सेवा क्षेत्रात कार्यरत असून, एक अधिकृत Mahaonline VLE आणि अनुभवी Aadhaar Supervisor म्हणून हजारो नागरिकांना ऑनलाईन सेवा आणि आधार संबंधित मदत पुरवली आहे. स्वतःचे Mahaonline केंद्र चंद्रपूर जिल्ह्यातील, गोंडपिपरी शहरात असून, केंद्राच्या माध्यमातून विविध शासकीय योजना, दाखले, पॅन कार्ड, आधार अपडेट, व इतर अनेक सेवा लोकांपर्यंत पोहोचवल्या आहेत. आणखी वाचा

Leave a Comment

WhatsApp Icon
व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉइन करा !