june 2025 rule changes india: १ जून २०२५ पासून देशात हे नियम बदलले, जाणून घ्या सविस्तर माहिती!

June 2025 rule changes india: जून २०२५ ला देशात अनेक महत्त्वाचे बदल झाले आहेत. हे बदल थेट आपल्याला आर्थिक व्यवहार, गुंतवणूक, डिजिटल व्यवहार आणि आधारसंबंधी सेवा यावर परिणाम करणार आहेत. म्हणूनच, या महिन्यात काय काय बदल झाले आहेत, ते जाणून घेण अत्यंत आवश्यक आहे.

Major Changes from June 2025

१. EPFO 3.0

Employee Provident Fund Organisation (EPFO) ने आता EPFO 3.0 नावाचे नवीन प्लॅटफॉर्म सुरू केले आहे. या नवीन प्लॅटफॉर्ममुळे PF काढण्याची प्रक्रिया अगदी सोपी झाली आहे.

पूर्वी PF काढण्यासाठी भरपूर कागदपत्रे आणि वाट पाहावी लागायची, पण आता तुम्ही तुमच्या मोबाईलवरून UPI किंवा ATM द्वारे थेट तुमच्या खात्यात पैसे काढू शकता. यासाठी कोणतीही भौतिक फॉर्म भरण्याची किंवा ऑफिसला जावे लागण्याची गरज नाही. हा बदल PF काढणाऱ्या कामगारांसाठी आणि निवृत्त व्यक्तींसाठी खूपच सोयीचा आहे.

२. FD (Fixed Deposit)

सूर्योदय स्मॉल फायनान्स बँकेने नुकत्याच त्यांच्या FD वरचा व्याजदर कमी केला आहे. FD हे अनेक जणांच्या बचतीच सुरक्षित माध्यम आहे. मात्र, व्याजदर कमी झाल्यामुळे आता FD मध्ये पैसे गुंतवणूक करणाऱ्यांना कमी नफा मिळणार आहे. त्यामुळे, खासकरून निवृत्त व्यक्ती आणि दीर्घकालीन बचतदारांनी त्यांच्या गुंतवणुकीबाबत पुन्हा विचार करणे गरजेचे आहे. बाजारातील इतर पर्यायांचा शोध घेतल्यास चांगल्या व्याजदरांवर गुंतवणूक करता येईल.

३. क्रेडिट कार्ड

आता क्रेडिट कार्डद्वारे काही विशिष्ट व्यवहारांवर नवीन शुल्क लागू केले गेले आहे. उदाहरणार्थ, वीज बिल, मोबाईल रिचार्ज, आणि इंधनासाठी क्रेडिट कार्ड वापरल्यास आता अतिरिक्त शुल्क आकारले जाऊ शकते. शिवाय, जर ऑटो-डेबिट फेल झाला, म्हणजे तुमच्या खात्यात पैसे नसेल आणि तो व्यवहार रद्द झाला, तर दंडही भरावा लागेल. त्यामुळे, क्रेडिट कार्ड वापरताना खर्चावर जास्त लक्ष देण आवश्यक आहे, अन्यथा अनपेक्षित शुल्क तुमच्या बजेटवर ताण आणू शकतात.

४. एलपीजी सिलेंडरच्या किमती

१ जूनपासून व्यावसायिक वापरासाठी १९ किलो एलपीजी सिलेंडरच्या किमतीत २४ रूपये ची कपात झाली आहे. यामुळे छोटे उद्योगधंदे आणि व्यावसायिकांना थोडा दिलासा मिळेल. मात्र, घरगुती सिलेंडरच्या किंमतीत अद्याप काहीही बदल नाही. त्यामुळे घरगुती ग्राहकांनी अजून थोडा काळ संयम बाळगावा लागेल.

५. ATM वापरावर नवीन शुल्क

आधीच्या नियमांनुसार, प्रत्येक महिन्यात काही ठराविक संख्या ATM व्यवहार मोफत असायचे, पण आता जे लोक वारंवार पैसे काढतात त्यांच्यावर अतिरिक्त शुल्क लावले गेले आहे. उदाहरणार्थ, ४-५ वेळा मोफत व्यवहार झाल्यानंतर पुढच्या प्रत्येक व्यवहारावर ₹२०-२५ रुपये आकारले जातील. त्यामुळे, बँकिंग व्यवहार शक्य तितक्या डिजिटल माध्यमातून करण आणि ATM वापर कमी करण फायदेशीर ठरेल.

६. आधार कार्ड अपडेटची अंतिम तारीख

UIDAI ने १४ जून २०२५ ही आधार अपडेटची अंतिम तारीख जाहीर केली आहे. या तारखेपर्यंत तुम्ही तुमचा आधार मोफत अपडेट करू शकता. त्यानंतर, जर तुम्हाला आधार अपडेट करायचा असेल तर ५० रूपये शुल्क भराव लागेल. आधार अपडेट न केल्यास बँकिंग, सरकारी योजना, आणि इतर अनेक सेवांमध्ये अडथळे येऊ शकतात. त्यामुळे शक्य तितक्या लवकर आधार अपडेट करून घ्या.

७. UPI

UPI व्यवहार अधिक सुरक्षित करण्यासाठी आता तुम्हाला पैसे पाठवण्याच्या अगोदर प्राप्तकर्त्याच नाव पूर्णपणे दिसेल. यामुळे चुकीच्या खात्यात पैसे जाण्याची शक्यता कमी होईल. फसवणूक टाळण्यासाठी हा अतिशय महत्त्वाचा बदल आहे.

ज्यांच्याकडे स्मार्टफोन नाही, पण जे फिचर फोन वापरतात त्यांच्यासाठी UPI123Pay सेवा अधिक प्रभावी झाली आहे. आता त्यांना एका वेळी ₹१०,००० पर्यंत व्यवहार करता येतील. यामुळे डिजिटल व्यवहाराचा लाभ अधिक लोकांपर्यंत पोहोचेल, खासकरून ग्रामीण भागातील लोकांसाठी.

८. म्युच्युअल फंड

जर तुम्ही SIP किंवा लंपसम म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करत असाल, तर लक्षात ठेवा की कट-ऑफ वेळ बदलली आहे. ही वेळ न ओलांडता व्यवहार पूर्ण करणे आवश्यक आहे. उशीर झाल्यास तुमचा व्यवहार पुढच्या दिवशी होईल, ज्यामुळे बाजारभावांवर परिणाम होऊ शकतो. वेळेचे नियोजन करणं गरजेचं आहे.

९. जून महिन्यात बँका १२ दिवस बंद

जूनमध्ये शनिवार, रविवार आणि विविध राज्यांच्या सार्वजनिक सुट्ट्यांमुळे एकूण १२ दिवस बँका बंद राहणार आहेत. त्यामुळे महत्त्वाचे आर्थिक व्यवहार, मोठे रोकड काढणे, आणि व्यवहार शक्य तितक्या लवकर पूर्ण करणे आवश्यक आहे. उशीर केल्यास अडचणी येऊ शकतात.

जून २०२५ मध्ये झालेल्या या आर्थिक आणि तांत्रिक बदलांची माहिती ठेवल्याने तुम्ही तुमच्या पैशांचे नियोजन आणि डिजिटल व्यवहार अधिक चांगल्या प्रकारे करू शकता. EPFO 3.0 सारखे सोपे उपाय, UPI व्यवहारातील सुरक्षितता, आणि आधार अपडेटसारख्या अनिवार्य कामांची माहिती असणे प्रत्येक नागरिकासाठी गरजेचे आहे.

Photo of author

Sahil Ghive

मागील दहा वर्षांपासून डिजिटल सेवा क्षेत्रात कार्यरत असून, एक अधिकृत Mahaonline VLE आणि अनुभवी Aadhaar Supervisor म्हणून हजारो नागरिकांना ऑनलाईन सेवा आणि आधार संबंधित मदत पुरवली आहे.स्वतःचे Mahaonline केंद्र चंद्रपूर जिल्ह्यातील, गोंडपिपरी शहरात असून, केंद्राच्या माध्यमातून विविध शासकीय योजना, दाखले, पॅन कार्ड, आधार अपडेट, व इतर अनेक सेवा लोकांपर्यंत पोहोचवल्या आहेत.अधिकृत Mahaonline VLE असल्यामुळे त्यांचे सेतु केंद्र आणि इतर माहिती Mahaonline च्या अधिकृत वेबसाइटवर आहे, त्यांनी मिळवलेल्या अनुभवामुळेच नागरिकांचा त्यांच्यावर विश्वास आहे.सरकारी योजना, GR (शासन निर्णय), आणि डिजिटल सेवा याबाबत मार्गदर्शक लेख लिहून लोकांमध्ये जागरूकता निर्माण करणे, माहिती लोकांपर्यंत सोप्या भाषेत पोहोचवणे आणि डिजिटल भारतात प्रत्येक नागरिकाला सक्षम करणे हा हेतू आहे.

Leave a Comment