FASTag Annual Pass: भारत सरकारने राष्ट्रीय महामार्गांवर प्रवास अधिक सुलभ आणि कटकटीविना करण्यासाठी FASTag Annual Pass सुरू करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी आज १८ जुन २०२५ रोजी याची घोषणा केली असून, हा पास येत्या १५ ऑगस्ट २०२५ पासून लागू होणार आहे.

हा वार्षिक पास खासगी (नॉन-कमर्शियल) वाहनांसाठीच उपलब्ध असून, कार, जीप आणि व्हॅनसारख्या वाहनांना याचा लाभ मिळणार आहे. या वार्षिक पासची किंमत ₹३,००० इतकी असून याचा उपयोग २०० ट्रिपपर्यंत किंवा एका वर्षासाठी (जे आधी पूर्ण होईल तेवढे) करता येईल.
FASTag Annual Pass म्हणजे काय?
FASTag Annual Pass हा एक वार्षिक प्रीपेड पास आहे, जो कार, जीप, व्हॅनसारख्या खासगी वाहनांसाठी तयार करण्यात आला आहे. एकदा सक्रिय केल्यावर, तो १ वर्ष किंवा २०० टोल ट्रिपपर्यंत वैध असेल.
FASTag Annual Pass चा उद्देश काय आहे?
गडकरी यांनी स्पष्ट केले की, हा उपक्रम टोल बूथवर होणारी गर्दी कमी करण्यासाठी, प्रवास वेगवान करण्यासाठी आणि ६० किमी अंतराच्या आत असणाऱ्या टोल नाक्यांवरील तक्रारी दूर करण्यासाठी करण्यात आला आहे. या पासमुळे एकाच व्यवहारातून संपूर्ण वर्षभराची टोल फी भरता येईल.
FASTag एनुअल पास स्कीम से संबंधित जानकारी।#FASTagBasedAnnualPass #PragatiKaHighway pic.twitter.com/OvGHbtAEFG
— Nitin Gadkari (@nitin_gadkari) June 18, 2025
किंमत आणि बचत किती होणार?
- वार्षिक पासची किंमत: ₹३,०००
- २०० ट्रिप झाल्यास, एका टोल क्रॉसिंगचा सरासरी खर्च: ₹१५
- सामान्यतः वर्षभरात टोलवर ₹१०,००० खर्च करणाऱ्या प्रवाशाला आता ₹७,००० पर्यंत बचत होणार.
गडकरी म्हणाले, “पूर्वी लोकांना टोलवर किमान ₹१०,००० खर्च करावे लागत होते, आता हा खर्च ₹३,००० मध्ये संपेल. म्हणजेच थेट ₹७,००० ची बचत होईल.”
हा पास कुठे लागू होईल?
- फक्त राष्ट्रीय महामार्ग (NH) आणि नॅशनल एक्स्प्रेसवे (NE) वर या पासचा लाभ घेता येईल.
- राज्य महामार्ग किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या टोल नाक्यांवर FASTag ने सामान्यच काम करेल आणि नेहमीप्रमाणे शुल्क लागू होईल.
FASTag Annual Pass कसा खरेदी करायचा?
हा पास खरेदी करण्यासाठी लवकरच एक डेडिकेटेड लिंक सुरू करण्यात येणार आहे. याशिवाय खालील माध्यमांवरूनही पास खरेदी आणि ऍक्टिवेट करता येईल:
- राजमार्ग यात्रा अॅप (Rajmarg Yatra App)
- NHAI ची अधिकृत वेबसाईट
- रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालय MoRTH ची वेबसाईट
Important Announcement 📢
— Nitin Gadkari (@nitin_gadkari) June 18, 2025
🔹In a transformative step towards hassle-free highway travel, we are introducing a FASTag-based Annual Pass priced at ₹3,000, effective from 15th August 2025. Valid for one year from the date of activation or up to 200 trips—whichever comes…
जुना FASTag वापरता येईल का?
होय. नवीन FASTag खरेदी करण्याची गरज नाही. मात्र, काही अटी पूर्ण असाव्यात:
- FASTag वाहनाच्या विंडशील्डवर योग्यरित्या लावलेला असावा.
- व्हेईकल रजिस्ट्रेशन नंबरशी लिंक केलेला असावा.
- FASTag ब्लॅकलिस्टमध्ये नसावा.
एक ट्रिप म्हणजे काय?
क्लोज टोलिंग रूटसाठी (जसे की दिल्ली-मुंबई एक्स्प्रेसवे): एक ट्रिप म्हणजे इन आणि आउट दोन्हीचा समावेश.
ओपन टोलिंग रूटसाठी (जसे की दिल्ली-चंदीगड): प्रत्येक टोल नाका एक स्वतंत्र ट्रिप म्हणून मोजला जाईल. पुढे-मागे गेल्यास दोन ट्रिप.
पास संपल्यानंतर काय?
एकदा २०० ट्रिप पूर्ण झाल्यावर किंवा १ वर्ष संपल्यावर, वापरकर्ता पास पुन्हा रिचार्ज करू शकतो.
वर्षात कितीही वेळा पास रिन्यू करता येऊ शकतो.
कोणाला सर्वाधिक फायदा होणार?
दररोज शहर ते शहर प्रवास करणारे नागरिक, विशेषतः NCR (नॅशनल कॅपिटल रिजन) मधील प्रवासी.
गावी वारंवार ये-जा करणारे नागरिक, ज्या भागात टोल नाके अगदी कमी अंतरावर आहेत, अशांसाठी हा पास वरदान ठरणार आहे.
सरकारच्या पुढील योजनाही मार्गी
नितीन गडकरी यांनी जाहीर केलं की, येत्या काळात वाहनांची नंबर प्लेट ओळखून टोल आकारणारी बॅरियरशिवाय टोल प्रणाली (ANPR तंत्रज्ञान आधारित) देशभरात लागू करण्यात येणार आहे. या सिस्टिममुळे टोलवर गाड्या थांबण्याची गरजच राहणार नाही. नियम न पाळल्यास ई-नोटीस दिली जाईल आणि FASTag सस्पेंड होऊ शकतो.
थोडक्यात: FASTag Annual Pass बद्दल मुख्य गोष्टी
मुद्दा | माहिती |
---|---|
किंमत | ₹3,000 |
वैधता | १ वर्ष किंवा २०० ट्रिप |
पात्रता | फक्त खासगी कार, जीप, व्हॅन |
सुरूवात | १५ ऑगस्ट २०२५ पासून |
खरेदीचे ठिकाण | राजमार्ग यात्रा अॅप, NHAI व MoRTH वेबसाईट |
बचत | वर्षभरात ₹७,००० पर्यंत |
FAQ: FASTag Annual Pass संबंधित प्रश्न
FASTag Annual Pass म्हणजे काय?
FASTag Annual Pass हा खासगी वाहनांसाठी असून, एकाचवेळी २०० ट्रिप्स किंवा १ वर्षासाठी ₹३,००० मध्ये टोलमुक्त प्रवास करण्याची सुविधा मिळणार आहे.
हा पास कोणासाठी आहे?
हा पास फक्त खासगी (नॉन-कमर्शियल) वाहनांसाठी आहे जसे की, कार, जीप, व्हॅन यासारखी वाहने. व्यावसायिक वाहनांना याचा लाभ मिळणार नाही.
FASTag Annual Pass कधीपासून लागू होणार आहे?
हा पास १५ ऑगस्ट २०२५ पासून देशभरात लागू होईल.
या पासची किंमत किती आहे?
पासची वार्षिक किंमत ₹३,००० इतकी आहे.
या पासची वैधता किती आहे?
हा पास सक्रिय केल्यापासून १ वर्ष किंवा २०० ट्रिप, यापैकी जे आधी पूर्ण होईल तेवढा कालावधी वैध असतो.