Aadhaar Card Update Last Date: तुमच आधार कार्ड तुम्हाला अनेक ठिकाणी कामी पडते जसे कि, बँक खाते उघडताना, विविध शासकीय योजनांचा लाभ घेताना, नवीन सिम कार्ड घ्यायला, शासकीय कार्यालयांमध्ये अर्ज करताना, अगदी दररोज तुम्हाला आधार कार्ड च काम पडत. पण जर त्या कार्डावर चुकीची माहिती असेल, तर ही गोष्ट लहान वाटणार पण हे कार्ड तुमच्या मोठ्या कामात अडथळा ठरू शकत.

आधार कार्ड अपडेटसाठी UIDAI (भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण) ने १४ जून २०२५ ही अंतिम मुदत (Aadhaar Card Update Last Date) जाहीर केली आहे. ज्या आधी नागरिकांना त्यांच्या आधार कार्डातील माहिती मोफत अपडेट करण्याची संधी देण्यात आली आहे. १४ जून २०२५ नंतर कोणतीही बदल किंवा दुरुस्ती करताना शुल्क आकारल जाणार आहे.
अशा लहान चुकीमुळे मोठ्या संधी हातातून जातात. UIDAI कडून आलेली ही मोफत दुरुस्तीची सुविधा त्याचसाठी आहे. गरज असलेल्या माहितीचा वेळीच सुधार करून पुढील त्रास टाळण्यासाठी.
‘पत्ता चुकीचा आहे, म्हणून फॉर्म रिजेक्ट झाला’ – अनेकांचा अनुभव
आपण अनेकदा लोकांच्या तोंडून ऐकत असतो कि, पत्ता चुकीचा आहे त्यामुळे माझा फॉर्म रिजेक्ट झाला किंवा मला सुविधा मिळू शकत नाही. अनेक लोकांचे अश्या आधार कार्डच्या चुकांमुळे खूप मोठे नुकसान झाले आहे.
अशा लहान चुकीमुळे मोठ्या संधी हातातून जातात. UIDAI कडून आलेली ही मोफत दुरुस्तीची (Aadhaar Card Update) सुविधा त्याचसाठी आहे, गरज असलेल्या माहितीचा वेळीच सुधार करून पुढील त्रास टाळण्यासाठी.
कोणती माहिती तुम्ही घरबसल्या अपडेट करू शकता?
आधार कार्ड चा पत्ता अपडेट (Aadhaar Card Update) तुम्ही स्वतः तुमच्या घरून सुद्धा करू शकता. त्यासाठी myaadhaar.uidai.gov.in या वेबसाइटवर लॉगिन करून फक्त काही टप्प्यांत ही प्रक्रिया पार पडते.
तुमच्या आधार क्रमांकाने लॉगिन करून, आवश्यक कागदपत्र अपलोड केल्यावर ‘Submit’ केलं की तुम्हाला एक SRN (Service Request Number) दिला जातो, ज्याद्वारे पुढील स्टेटस कधीही ट्रॅक करता येतो.
बायोमेट्रिक बदल हवा आहे? मग केंद्रावर जा लागेल
जर आधारमध्ये फोटो, फिंगरप्रिंट किंवा डोळ्याच्या स्कॅनसंबंधित कोणताही बायोमेट्रिक बदल करायचा असेल, तर तो ऑनलाइन करता येत नाही. अशा बदलांसाठी तुम्हाला जवळच आधार सेवा केंद्र गाठण आवश्यक आहे. १४ जून ही आधार कार्ड अपडेट (Aadhaar Card Update) ची शेवटची तारीख असल्यामुळे नागरिकांमध्ये घाई सुरू झाली आहे आणि अनेक आधार सेंटर वर मोठ्या प्रमानात गर्दी सुद्धा आहे.
१० वर्षांनी एकदा दस्तऐवज अपडेट करण बंधनकारक का?
UIDAI च्या धोरणानुसार, प्रत्येक आधार धारकाने १० वर्षांत एकदा तरी आधार कार्ड अपडेट करण गरजेच आहे. यामागचा उद्देश स्पष्ट आहे, नागरिकांची माहिती अद्ययावत ठेवण, चुकीचे किंवा कालबाह्य नोंदी टाळण आणि सेवा पुरविणाऱ्यांसाठी योग्य माहिती उपलब्ध करून देण.
चुकीची माहिती म्हणजे सरकारी सेवांसाठी अडथळा
केंद्र सरकारच्या आणि राज्य सरकारांच्या विविध योजनांसाठी आधार अनिवार्य झाला आहे. शेतकऱ्यांसाठी PM-KISAN, महिला लाभार्थ्यांसाठी उज्ज्वला योजना, वयोवृद्धांसाठी पेन्शन, या सगळ्यांसाठी आधार कार्ड बंधनकारक आहे.
परंतु जर आधार कार्डावर नाव किंवा पत्ता चुकीचा असेल, तर लाभ मिळण कठीण होत. अशा परिस्थितीत एखाद्या गरीब व्यक्तीला केवळ चुकीच्या माहितीमुळे महिन्यांचा वेळ आणि पैसा वाया जाऊ शकतो.
Aadhaar Card Update साठी १४ जूननंतर लागणार शुल्क
UIDAI च्या सूचनेनुसार, १४ जूनच्या पुढे ऑनलाइन माहिती अपडेट करताना ५० रुपये इतक शुल्क लागेल. जरी ही रक्कम फारशी मोठी नसेल, तरी सध्या मिळणारी मोफत सुविधा का सोडावी? फक्त १० मिनिटांत, कोणत्याही लांबचवड्या प्रक्रियेविना, घरात बसूनच आधार कार्ड अपडेट (Aadhaar Card Update) करून घेता येतो.
एक छोटा बदल – मोठा फरक!
आधार कार्ड हे आता फक्त ओळखीच साधन उरलेल नाही, तर तुमच्या प्रत्येक आर्थिक व प्रशासकीय व्यवहाराचा पाया झाल आहे. त्यामुळे तुम्ही जर विचार करत असाल की “चालेल अस जुन माहिती असलेल आधार,” तर हा विचार लगेच बदला.
आजच स्वतःच आधार तपासा आणि गरज असल्यास १४ जूनच्या आत अपडेट करून घ्या. कारण एक चुकीचा पत्ता किंवा चुकीची जन्मतारीख तुम्हाला अनेक ठिकाणी अडवू शकते. आणि त्यासाठी ५० रुपये खर्चून पुन्हा नवा वेळ शोधावा लागेल.
FAQ: वारंवार विचारले जाणारे प्रश्न
आधार कार्ड मोफत अपडेट करण्याची शेवटची तारीख काय आहे?
आधार कार्ड ऑनलाइन मोफत अपडेट करण्याची अंतिम तारीख १४ जून २०२५ आहे.
आधार कार्ड अपडेट करताना फी लागते का?
१४ जून २०२५ पर्यंत ऑनलाइन अपडेट पूर्णपणे मोफत आहे. त्यानंतर ₹५० फी आकारली जाईल.
मी घरबसल्या आधार कार्ड अपडेट करू शकतो का?
होय, तुम्ही myAadhaar पोर्टलवर जाऊन घरबसल्या तुमचे आधार कार्ड अपडेट करू शकता.