मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना मे 2025! आजपासून खात्यावर येणार पैसे!

On: Thursday, June 5, 2025

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना मे 2025: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या मे महिन्याच्या सन्मान निधी वितरणाची प्रक्रिया सुरु झाली आहे, महाराष्ट्रातील महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम आणि आत्मनिर्भर करण्याच्या उद्देशाने महायुती सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना मे 2025,
Ladki Bahin Yojana May 2025 payment started, women receiving direct fund transfer in bank accounts from 5th June

या योजनेतील सर्व पात्र लाभार्थ्यांना, मे महिन्याचा सन्मान निधी वितरीत करण्याची तांत्रिक प्रक्रिया ४ जून २०२५ पासून सुरू झाले आहे, अशी माहिती आदिती तटकरे यांनी त्यांच्या सोशल मीडिया X खात्यावरून दिली आहे. या बातमीमुळे लाडक्या बहिणींना दिलासा मिळाला आहे.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना म्हणजे काय?

राज्यातील आर्थिकदृष्ट्या कमकुवत आणि गरजू महिलांसाठी राज्य सरकारनं ही योजना सुरु केली आहे. यामध्ये महिलांना दर महिन्याला ठराविक रक्कम आर्थिक मदतीसाठी दिली जाते. ही रक्कम घरखर्च, मुलांचं शिक्षण किंवा छोटासा व्यवसाय सुरू करण्यासाठी उपयोगी पडते. महिलांच्या हातात थेट पैसे दिल्यामुळे त्यांच्या स्वावलंबनाला बळ मिळत.

हे सुद्धा वाचा: राज्यात प्रत्येकाला मिळणार हक्काचे घर; ३० लाख घरकुल मंजुर, महाराष्ट्र सरकारची घोषणा!

मे महिन्याचा सन्मान निधी कधी मिळणार?

राज्यमंत्री आदिती तटकरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, माझी लाडकी बहीण योजनेतून मे महिन्याचा सन्मान निधी देण्याची प्रक्रिया ४ जून २०२५ पासून सुरू झाली आहे.

सर्वात महत्त्वाचं म्हणजे, ज्यांचे बँक खाते आधार कार्डशी जोडलेले आहेत, अशा पात्र महिलांच्या खात्यात ५ जून २०२५ पासून ही रक्कम जमा होऊ लागली आहे. म्हणजे आता लाभार्थी महिलांना कुठेही जाण्याची गरज नाही, सरळ त्यांच्याच खात्यात हे पैसे जमा होणार आहेत.

सरकारचा दृढ निश्चय

आदिती तटकरे यांनी आपल्या ट्विटमध्ये महायुती सरकारचा या योजनेवरील दृढनिश्चय सांगितला आहे. त्यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे की, “महायुती सरकारचा दृढ निश्चय, माननीय मुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस साहेब, माननीय उपमुख्यमंत्री श्री. एकनाथजी शिंदे साहेब, माननीय उपमुख्यमंत्री श्री. अजितदादा पवार यांचे सातत्यपूर्ण मार्गदर्शन व महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींचा दृढ विश्वास या बळावर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची दमदार वाटचाल यापुढेही अशीच सुरू राहणार हा मला विश्वास आहे.”

पुढील वाटचाल

आदिती तटकरे यांनी त्यांच्या सोशल मीडिया पोस्टमध्ये व्यक्त केल्याप्रमाणे, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची दमदार वाटचाल यापुढेही अशीच सुरू राहणार असल्याचा विश्वास आहे. यामुळे महाराष्ट्रातील लाखो भगिनींना या योजनेचा सातत्याने फायदा मिळत राहील. महिलांना आर्थिक सुरक्षा आणि सन्मानाने जगण्याचा हक्क मिळवून देण्याच्या सरकारच्या प्रयत्नांना या योजनेमुळे आणखी बळ मिळेल, यात शंका नाही.

Photo of author

लेखकाबद्दल

साहिल घिवे

मागील दहा वर्षांपासून डिजिटल सेवा क्षेत्रात कार्यरत असून, एक अधिकृत Mahaonline VLE आणि अनुभवी Aadhaar Supervisor म्हणून हजारो नागरिकांना ऑनलाईन सेवा आणि आधार संबंधित मदत पुरवली आहे. स्वतःचे Mahaonline केंद्र चंद्रपूर जिल्ह्यातील, गोंडपिपरी शहरात असून, केंद्राच्या माध्यमातून विविध शासकीय योजना, दाखले, पॅन कार्ड, आधार अपडेट, व इतर अनेक सेवा लोकांपर्यंत पोहोचवल्या आहेत. आणखी वाचा

Leave a Comment

WhatsApp Icon
व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉइन करा !