Ladki Bahin Yojana Loan 2025: लाडकी बहीण योजनेचा जबरदस्त लाभ! आता मिळणार १ लाखांचं कर्ज, तेही शून्य टक्के व्याजाने!

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Ladki Bahin Yojana Loan 2025: महाराष्ट्रातील महिलांसाठी एक अत्यंत दिलासादायक बातमी नुकतीच समोर आली आहे. ‘लाडकी बहीण योजना’ ही आधीच महिलांना आधार देणारी योजना होती, पण आता त्यात आणखी एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे, महिलांना व्यवसायासाठी १ लाख रुपयांपर्यंतच कर्ज आता शून्य टक्के व्याजदराने मिळणार आहे.

Ladki Bahin Yojana Loan 2025 helps Maharashtra women start small businesses with zero interest

योजना म्हणजे काय?

ही योजना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पुढाकाराने सुरू झाली होती. यामध्ये, पात्र महिलांना दर महिन्याला १५०० रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. या पैशांचा उपयोग करून, अनेक महिलांनी छोट्या स्तरावर काम सुरू केली आहेत. पण आता या पुढच्या टप्प्यात त्यांना मोठ्या प्रमाणावर आधार मिळणार आहे.

आता बिनव्याजी कर्ज! – Ladki Bahin Yojana Loan 2025

पूर्वी जेव्हा कर्ज दिल जायच, तेव्हा त्यावर ९ टक्के व्याज आकारल जात होत. पण आता राज्य सरकारने हा व्याजदर शून्यावर आणला आहे. म्हणजेच महिलांना बँकेतून जे कर्ज मिळेल, त्यावर एक रुपयाही व्याज लागणार नाही. या कर्जावरच संपूर्ण व्याज शासनाच्या चार वेगवेगळ्या महामंडळांमार्फत भरल जाणार आहे. त्या संस्था म्हणजे:

  • अण्णासाहेब आर्थिक विकास महामंडळ
  • इतर मागासवर्गीय (OBC) महामंडळ
  • भटक्या व विमुक्त जाती महामंडळ
  • महाराष्ट्र पर्यटन महामंडळ अंतर्गत ‘आई’ योजना

या संस्थांमार्फत १२% पर्यंत व्याज शासन भरत, त्यामुळे लाभार्थी महिलेला काहीही भरायच नाही. पूर्वी ९ टक्के व्याज आकारले जात होते, परंतु आता शासनाद्वारे १२% पर्यंतचे संपूर्ण व्याज भरले जाईल, जेणेकरून लाभार्थीला एकही रुपया व्याज द्यावा लागणार नाही.

कोण करू शकत अर्ज?

या नव्या कर्जसुविधेचा लाभ घेण्यासाठी त्या महिलेन आधीपासून ‘लाडकी बहीण’ योजनेत नाव नोंदवलेल असण आवश्यक आहे. त्यानंतर संबंधित महिलेला सध्या मुंबई बँकेत जाऊन अर्ज करावा लागेल.

जर एखादी महिला स्वतःचा छोटा व्यवसाय सुरू करू इच्छित असेल, तर ही सुवर्णसंधी आहे. विशेष बाब म्हणजे जर ५ ते १० महिला मिळून एखादा उद्योग सुरू करणार असतील, तर त्यांना प्राधान्य दिल जाणार आहे.

अर्जाची सोपी प्रक्रिया

  • आधी ‘लाडकी बहीण’ योजनेची लाभार्थी असण गरजेच आहे.
  • जवळच्या मुंबई बँकेच्या शाखेला भेट द्या.
  • कोणता व्यवसाय सुरू करणार आहात, याची सविस्तर माहिती द्या.
  • बँकेकडून व्यवसाय तपासला जाईल.
  • पात्रता ठरल्यावर १ लाख रुपयांपर्यंतच कर्ज मंजूर केल जाईल.

किती महिलांना फायदा होणार?

सध्या मुंबई आणि आसपासच्या परिसरात १२ ते १३ लाख महिला या योजनेच्या लाभार्थी आहेत. त्यापैकी जवळपास १ लाख महिला मुंबई बँकेच्या सदस्य आहेत, आणि या सर्व महिलांना हे कर्ज घेण्याची संधी आहे.

शेवटच मत

राज्य सरकारच्या या निर्णयामुळे अनेक महिलांना त्यांच्या पायावर उभ राहण्याची संधी मिळेल. दरमहा मिळणाऱ्या १५०० रुपयांच्या मदतीपलीकडे आता १ लाख रुपयांच कर्जही मिळणार आहे, तेही एक पैसाही व्याज न देता! (Ladki Bahin Yojana Loan 2025) त्यामुळे ज्यांना काही तरी वेगळ करायचय, स्वतःचा व्यवसाय सुरू करायचाय, त्यांनी ही संधी नक्कीच सोडू नये.

अधिक माहितीसाठी, आजच आपल्या जवळच्या मुंबई बँकेच्या शाखेला भेट द्या! आणि ladakibahin.maharashtra.gov.in अधिकृत वेबसाईट ला भेट द्या!

Photo of author

Sahil Ghive

मागील दहा वर्षांपासून डिजिटल सेवा क्षेत्रात कार्यरत असून, एक अधिकृत Mahaonline VLE आणि अनुभवी Aadhaar Supervisor म्हणून हजारो नागरिकांना ऑनलाईन सेवा आणि आधार संबंधित मदत पुरवली आहे.स्वतःचे Mahaonline केंद्र चंद्रपूर जिल्ह्यातील, गोंडपिपरी शहरात असून, केंद्राच्या माध्यमातून विविध शासकीय योजना, दाखले, पॅन कार्ड, आधार अपडेट, व इतर अनेक सेवा लोकांपर्यंत पोहोचवल्या आहेत.अधिकृत Mahaonline VLE असल्यामुळे त्यांचे सेतु केंद्र आणि इतर माहिती Mahaonline च्या अधिकृत वेबसाइटवर आहे, त्यांनी मिळवलेल्या अनुभवामुळेच नागरिकांचा त्यांच्यावर विश्वास आहे.सरकारी योजना, GR (शासन निर्णय), आणि डिजिटल सेवा याबाबत मार्गदर्शक लेख लिहून लोकांमध्ये जागरूकता निर्माण करणे, माहिती लोकांपर्यंत सोप्या भाषेत पोहोचवणे आणि डिजिटल भारतात प्रत्येक नागरिकाला सक्षम करणे हा हेतू आहे.

Leave a Comment

WhatsApp Icon
व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉइन करा !